पुणे:एका अंमलदाराकडे साधारणपणे दोन ते तीन जर गुन्हेगार दत्तक असले तर त्यांचे कामही प्रभावीपणे होईल आणि गुन्हेगारांवरसुद्धा वचक पडेल यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुन्हेगार दत्तक योजनेमुळे पोलिसांचे कारवाईचे प्रमाण वाढणार असल्यामुळे ही योजना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात राबविण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली. एका पोलिसाकडे जर दोन-तीन गुन्ह्यांचा तपास असेल तर त्याची कार्यशक्तीसुद्धा वाढते आणि त्यातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, असा हा उपक्रम असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तातील परिमंडळ क्रमांक तीन मधल्या गुन्हेगारांचे आदान प्रदान करण्यात आले आहे. परिमंडळ ३ मध्ये कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रोड, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश असून यामधील गुन्हेगारांची ओळख पटवून आदान-प्रदान करण्यात आले आहे.
Criminal Adoption Scheme In Pune : पुणे पोलिसांकडून गुन्हेगार दत्तक योजना उपक्रम; वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लागणार का? - पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे वाढते स्वरूप पाहता पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरांमध्ये गुन्हेगार दत्तक योजना राबवली जात आहे. जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराने कुठलेही सक्रिय गुन्हेगारी करू नये, त्याच्यावर लक्ष ठेवता यावे यासाठी पुण्यामध्ये ठाणे अंमलदार आहेत त्यांना आता ह्या गुन्हेगारांना दत्त घ्यायचे आहे.
काय आहे योजनेचा फायदा ? गुन्हेगाराने कुठल्याही शारीरिक गुन्हे करू नये किंवा इतर गुन्हे करू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये गुन्हेगारांना बोलवण्यात आले, त्यांची ओळख प्रिंट करण्यात आली आणि तो कुठल्या पोलीस ठाण्याला हवा असल्यास किंवा तो फरार असल्यास तो त्या पोलीस ठाण्याला देण्यात यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे, अशी माहितीसुद्धा पोलीस वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिलेली आहे. जवळपास 120 रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची ओळख आज कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांकडून जातीने प्रत्येकाची ओळख पटवून करून घेण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसेल अशी पोलिसांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :Pune News : 10 कोटींची गुंतवणूक करत जर्मन दाम्पत्यांनी ओसाड माळरानावर लावले 35 हजार झाडे