पुणे: स्वता आयएएस या पदावर असून सध्या पंतप्रधान कार्यालय येथे सेक्राेटरी या पदावर काम करीत असल्याचे सांगत, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखेने याचा अधिक तपास केला असता हा तोतया आयएएस अधिकारी हा फक्त प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावायचा. एवढेच नव्हे तर या तोतया अधिकाऱ्याच्या विरोधात धुळे येथे एक गुन्हा देखील दाखल आहे. या प्रकरणी वासुदेव निवृत्ती तायडे वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तेळेगाव, दाभाडे, पुणे. असे अटक करण्यात आलेल्या या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
आयएएस पदाबाबत संशय: याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील औंध येथील बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या वतीने जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून हा तोतया आयएएस अधिकारी स्वता आयएएस या पदावर असून सध्या पंतप्रधान कार्यालय येथे सेक्राेटरी या पदावर काम करीत असल्याचे सांगत होता. यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य देखील हजर हाेते. या वेळी त्यांचेकडे संस्थेचे पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली. त्यावेळी आयएएस पदाबाबत त्यांना संशय वाटला आहे.
तोतया आयएएस अधिकारी म्हणून वावरणाऱ्या वासुदेव निवृत्ती तायडे हा, स्वता आयएएस असल्याचे सांगून फक्त प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावायचा -अमोल झेंडे पोलीस उपायुक्त