महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला दमदाटी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल - baramati latest news

बारामती तालुका पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर धावून येत दमदाटी करण्यात आली.

पोलीस कार्यालय
पोलीस कार्यालय

By

Published : Jan 31, 2021, 6:37 PM IST

बारामती- तालुका पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर धावून येत दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी समीर बापू चौधर (रा. रुई, बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत तक्रीर दिली.

काय आहे प्रकरण-

शुक्रवारी (दि. 29) रोजी सायंकाळी ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर काही लोकांचा आरडाओरडा गोंधळ सुरु होता. त्यामुळे ठाणे अंमलदार ठोंबरे यांनी तक्रारदाराला बाहेर जावून काय गोंधळ चालला आहे, ते पहा, असे सांगितले. तक्रारदाराने अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर जावून पाहिले असता वादावादी करणारे पळून गेले. तेथे जमलेल्या लोकांकडे चौकशी केली असता चौधर हा येथे गोंधळ घालत असल्याचे समजले. त्यानुसार त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी मिळवत त्याला फोन केला.

तक्रादाराला ढकलून दिले-

परंतु त्याने फोन उचलला नाही. काही वेळाने फोन उचलल्यानंतर पोलिसांनी बाहेर गोंधळ का घालत होता. तातडीने पोलीस ठाण्यात या, असा निरोप दिला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास चौधर पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी त्याने मला फोन कोणी केला होता, अशी विचारणा केली. तक्रादाराने मीच फोन केला होता. बाहेर गोंधळ का घालत होता, अशी विचारणा केली. त्यावर तु मला विचारणारी कोण, असे म्हणत तो अंगावर धावून गेला. तक्रादाराला ढकलून देत त्याने तुझी लायकी आहे का मला फोन करायची, असे म्हणून तुला बघून घेतो, अशी दमबाजी केली. तक्रारदाराने ठाणे अंमलदार कक्षात ही माहिती दिली. त्यानंतर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा चौधर यांच्याविरोधात दाखल करण्यात आला.

हेही वाचा-पुण्यात अल्पवयीन मुलाचा खून, मृतदेह निर्जन ठिकाणी फेकला

ABOUT THE AUTHOR

...view details