पुणे -भोर तालुक्यातील पिसावरे या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. ही ओळख येथील शाळेत शिकणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिली आहे. निर्सगसंपन्न असलेल्या या गावातील रहिवासीही निसर्गाची जोपासना करतात. यामुळेच निसर्गानेही त्यांना ही नवीन ओळख बहाल केली आहे. याशिवाय गावातील विद्यार्थ्यांनाही आता निसर्गाची गोडी लागलेली आहे.
या गावात 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी 85 पेक्षा जास्त विविध प्रकाराची फुलपाखरे आढळून येतात. कोणत्या झाडावर कोणती फुलपाखरे व पक्षी आढळतात याची संपूर्ण माहिती येथील विद्यार्थ्यांना आहे. नुकतेच पक्षी प्रेमी आणि शिक्षक संतोष दळवी यांनी फुलपाखरांच्या उद्यानाचे उद्घाटन ( Butterflies Garden ) केले.