बारामती -खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरोधात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सीआर संघटनेचे उपाध्यक्ष चेतन कुलकर्णी यांनी केली आहे. १२ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील सिहोर येथे आयोजित एका संमेलनात त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थन केले होते. हे वक्तव्य करताना त्यांनी जी शब्दरचना वापरली. त्यामुळे दलित समाजाचा अपमान झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गांभीर्याने विचार करून कारवाई करावी -
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ कुचेकर यांनी 19 डिसेंबर रोजी एएनआय या वृत्त संस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पहिला. या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ व बातमी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केली आहे. या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुचेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - तलाक. तलाक.. तलाक...! पुण्यात राहणाऱ्या विवाहितेला अमेरिकेतून दिला तोंडी तलाक