महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही निश्चित कारवाई - कृष्ण प्रकाश

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे येताच अवैध धंद्यांवर आळा बसायला सुरुवात झाली आहे. थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकास आयुक्तांनी इशारा दिला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू ठेवल्यास त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

POLICE COMMISSIONER KRISHNA PRAKASH
पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल

By

Published : Oct 22, 2020, 2:13 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे येताच त्याच्यावर आळा बसायला सुरुवात झाली आहे. थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकास आयुक्तांनी इशारा दिला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जाणूनबुजून सुरू ठेवल्यास त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सामाजिक सुरक्षा पथकामार्फत होत असलेल्या कारवाईचे रेकॉर्ड ठेवले जात आहेत. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारताच प्रकाश यांनी मी असे पर्यंत अवैध धंदे बंद असणार असे स्पष्ट केले होते. दरम्यान, पोलीस वर्तुळात सर्वच पोलीस आयुक्त पहिल्यांदा असेच बोलतात अशी चर्चा होती. मात्र, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यांवर छापे मारीचा धडाका लावला आहे. यासाठी विशेष दोन पथकांची स्थापना केली असून सामाजिक सुरक्षा पथक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. गेल्या काही दिवसात अवैध धंद्यांवर 16 कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यात लाखोंचा मुद्देमाल आणि अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड, निगडी, हिंजवडी, देहूरोड, सांगवी, भोसरी, भोसरी एमआयडिसी, चिंचवड, पिंपरी, चाकण आणि म्हाळुंगे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा पथकाने अवैध धंद्यांवर छापे टाकले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, अवैध धंदे काही प्रमाणात बंद झाले आहेत. पण अजून काही जण धंदे सुरू ठेवण्याचे धाडस करत आहेत. यात संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करणार. पोलीस हद्दीत होत असलेल्या अवैध धंद्यांवरून दिसून येते की संबंधित पोलिसांची तिथे पकड नाही, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details