महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

12 वर्षांवरील प्रत्येकासाठी कोविड लस उपलब्ध - आदर पूनावाला - राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार (National Technical Advisor) गटाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची (Serum Institute of India) कोव्हॅक्स कोविड -19 लस 12-17 वयोगटासाठी मंजूर केली. ती उपलब्द आहे (Covovax available for everyone above age of 12 years) असे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla ) यांनी म्हणले आहे.

Adar Poonawalla
आदर पूनावाला

By

Published : May 5, 2022, 9:33 AM IST

Updated : May 5, 2022, 12:03 PM IST

पुणे: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी बुधवारी स्पष्ट केले की, कोविड-19 लस कोव्हॅक्स १२ वर्षांवरील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. पूनावाला यांनी ट्विट केले, "तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी कोवोव्हॅक्स प्रौढांसाठी उपलब्ध आहे का हे विचारले आहे. उत्तर होय आहे, ते 12 वर्षांवरील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे," असे पूनावाला यांनी ट्विट केले.

कोव्होॅक्स, आता भारतात मुलांसाठी उपलब्ध आहे. भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपमध्येही विकली जाते आणि तिची परिणामकारकता ९० टक्के आहे. आमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणखी एक लस उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हे सुसंगत आहे,” त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यात लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने 12-17 वयोगटासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हॅक्स कोविड -19 लसीला मान्यता दिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, सरकारने कोव्हॅक्सला आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मंजुरी दिली होती.

Last Updated : May 5, 2022, 12:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details