महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1200, तर पुणे जिल्ह्याचा आकडा 1094 - कोरोनाबाधिक आकडेवारी

आजपर्यंत पुणे विभागामध्ये एकूण 13 हजार 693 कोरोना नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 13 हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 11 हजार 812 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1 हजार 200 नमुन्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आहे.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

By

Published : Apr 25, 2020, 6:10 PM IST

पुणे- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण 939 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 1094 कोरोनाबाधित रुग्ण असून 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 26 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 42 बाधित रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 28 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 10 जण कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत पुणे विभागामध्ये एकूण 13 हजार 693 कोरोना नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 13 हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 11 हजार 812 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1 हजार 200 नमुन्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 51 लाख 36 हजार 845 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 98 लाख 14 हजार 639 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1067 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले असल्याची ही माहिती आयुक्त म्हैसेकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details