महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे विभागात 501 नव्या रुग्णांची भर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 404 रुग्ण

पुणे विभागात आज बाधित रुग्णांच्या संख्येत एकूण 501 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 असे रुग्ण वाढले आहेत.

COVID-19: Pune division reports over 501 new cases in over 24 hours
पुणे विभागात 501 नव्या रुग्णांची भर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 404 रुग्ण

By

Published : May 26, 2020, 7:31 PM IST

पुणे - विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 719 इतकी झाली आहे. यातील 3 हजार 674 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यघडीला 3 हजार 689 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात एकूण 356 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागातील आकडेवारी पैकी पुणे जिल्ह्यात 6 हजार 303 बाधित रुग्ण असून यातील 3 हजार 195 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 819 इतकी आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

25 मे रोजीच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येत एकूण 501 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 असे रुग्ण वाढले आहेत.

सातारा जिल्ह्यात 335 कोरोनाबाधित रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 621 बाधित रुग्ण असून 291 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 275 इतकी आहे. बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील बाधित 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 33 आहे. बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 361 इतकी आहे. बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 74 हजार 968 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59 हजार 688 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे साधेपणाने ईद साजरी, कोंढव्यात सर्व धर्मियांना दूध वाटप

हेही वाचा -पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; दिवसभरात आढळले 41 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details