महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकणमध्ये 1408 रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज! - chakan covid 19 update

खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पुणे मुंबई व इतर परिसरातून अनेक नागरिक आले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तातडीने उपचार मिळावे यासाठी चाकण महाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्‍यात आली आहे.

covid 19 Hospital
चाकणमध्ये 1408 रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज!

By

Published : May 15, 2020, 5:44 PM IST

पुणे -जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर तातडीचे उपचार मिळावे यासाठी चाकण औद्योगिक वसाहतीमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये 1 हजार 408 रुग्ण क्षमतेचे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

चाकणमध्ये 1408 रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सर्व सुविधांनी सज्ज!
खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पुणे मुंबई व इतर परिसरातून अनेक नागरिक आले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तातडीने उपचार मिळावे यासाठी चाकण महाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्‍यात आली आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर काम करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, सभापती अंकुश राक्षे गटविकास अधिकारी अजय जोशी उपस्थित होते.चाकण व राजगुरुनगर शिरूर जुन्नर परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असताना, जिल्हा परिषदेने या रुग्णालयाची उभारणी, मर्सिडीज बेंज ललिता मोतीलाल सांगला फाउंडेशन सिस्का एलइडी या कंपनीच्या सीएसआर फंडातून केली आहे. याठिकाणी प्रत्येक फ्लॅटमधील रूममध्ये एक रुग्ण अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तीन प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य खबरदारी घेऊन रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details