महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळिमा..! चुलत भावाने केला बहिणीचा विनयभंग - manchar crime news

पुण्यातील मंचर येथे चुलत भावानेच बहिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज (16 ऑगस्ट) घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

manchar police station
manchar police station

By

Published : Aug 16, 2020, 6:09 PM IST

आंबेगाव (पुणे) -नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.चुलत बहिण घरात एकटी असल्याचा फायदा घेत घरात घुसून चुलत भावानेच विनयभंग करत काठीने मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकीही दिली आहे. ही घटना मंचर शहरात आज (ता. 16 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेत जमिनीच्या वादातून तो नेहमी शिवीगाळ करत होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे, आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ असून हा तरुण नेहमीच मद्यपान करुन शेतजमिनीवरुन शिवीगाळी करत होता. रविवारी (16 ऑगस्ट) सकाळी मंचर येथील राहत्या घरात तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात आला. त्यावेळी पीडित तरुणी त्याला पाणी देत असताना तिच्याशी अश्लिल वर्तन सुरु केले. पीडितेने तु माझा भाऊ आहेस, असे म्हणत त्याचा विरोध केला. दरम्यान, आरोपी भावाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिक तपास करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details