पुणे: आज सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, कुरुलकर यांच्याकडे 4 ते 5 मोबाईल फोन होते. त्यातील 'वन प्लस 6 टी' हा मोबाईल फोन जो 'फॉरेन्सिक रिपोर्ट'साठी देण्यात आला होता. त्याचा तपास करण्यासाठी आज कुरुलकर यांनीच 'एटीएस' अधिकाऱ्यांच्या समोर हा फोन ओपन करून दिला आहे. आता त्याचा अधिक तपास करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी, असे सरकारी वकिलाकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली. याच्या तपासासाठी कुरुलकर यांना एक दिवसाची 'एटीएस' कोठडी देण्यात आली आहे.
'या'अधिकाऱ्यालाही आला फोन:आज न्यायालयात अजून एक बाब समोर आली आहे. ज्यात बेंगळुरू येथील 'एअर फोर्स'चे अधिकारी निखिल शेंडे यांना देखील सारख्याच पाकिस्तानी 'आयपी ऍड्रेस' वरून 'कॉल' आला होता. विशेष म्हणजे, याच नंबरने कुरुलकर यांनाही कॉल आला होता. याप्रकरणी निखिल शेंडे यांचा देखील जवाब घेण्यात आला आहे. 'एअर फोर्स'च्या चौकशी समितीकडून त्यांचीही चौकशी केली जात आहे.
'ती'दोघांशीही बोलायची पण..:विशेष म्हणजे, झारा दास गुप्ता ही महिला दोन अधिकाऱ्यांशी बोलत होती. एक म्हणजे कुरुलकर आणि दुसरे म्हणजे 'एअर फोर्स' येथील अधिकारी निखिल शेंडे हे आहे. पण यात अजून एक माहिती समोर आली आहे की, झारा दास गुप्ता ही महिला दोघांशी बोलत असताना दोघांनाही याची कल्पना नव्हती की, ती कोणाशी बोलत आहे. याचा तपास देखील आता करण्यात येत आहे.
'डीआरडीओ'च्या 'गेस्ट हाऊस'चा वापर:आज न्यायालयात अजून एक बाब समोर आली आहे. ज्यात आरोपी कुरुलकर यांनी मुंबईच्या 'डीआरडीओ'च्या 'गेस्ट हाऊस'चा देखील वापर केला आहे. तो कशाकरिता करण्यात आला, याचा देखील आता तपास केला जाणार आहे.
हेही वाचा:
- Student Suicide : विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या
- Sanjay Raut FIR : ...म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
- Rahul Gandhi : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना हजर राहण्यापासून सूट, 4 जुलै रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी