पुणे- नागरिकांनी मतदान करावे,मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाय केले जातात. मात्र,तरीही अनेक नागरिक मतदान करण्याबाबत निरुत्साही असतात. अशी परिस्थिती असतानाही परदेशात नोकरीनिमित्त असलेले एक पुणेकर दाम्पत्य केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यात दाखल झाले.
मतदान करण्यासाठी दाम्पत्य आफ्रिकेतून पुण्यात, १० हजार किलोमीटरचा प्रवास फक्त सशक्त भारतासाठी - loksabha election
परदेशात नोकरीनिमित्त असलेले एक पुणेकर दाम्पत्य केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यात दाखल झाले.
केवळ सशक्त लोकशाही बाबत चर्चा न करता आपली जबाबदारी देखील पार पाडली पाहिजे या उद्देशाने हे दाम्पत्य पुण्यात आले. विहंग खोपकर मूळचे पुण्याचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त ते पश्चिम आफ्रिकेतील गॅबॉन या देशात ओलेम कंपनीत नोकरी करतात. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार त्यांनी केला आणि २३ एप्रिलच्या मतदानाचा दिवस गाठण्यासाठी सपत्नीक दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून पुण्यात आले.
खोपकर यांच्या पत्नीचे मतदान गुजरातमध्ये असल्याने त्या तिकडे मतदानासाठी गेल्या. सशक्त,समृध्द आणि उज्वल भारतासाठी एका जबाबदार नागरिकांची भूमिका बजावल्याचा विहंग याना अभिमान आहे. त्यांनी कोथरूड येथे बारामती लोकसभेसाठी मतदान केले.