महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड तालुक्यातील कुसेगाव नजिक प्रेमीयुगुलाची आत्महत्या - couple commits suicide Kusegaon

एका प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दौंड तालुक्यातील कुसेगाव हद्दीतील वनविभागाच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी व्यक्त केला.

couple commits suicide Kusegaon
प्रेमीयुगुल आत्महत्या कुसेगाव

By

Published : May 23, 2021, 10:17 PM IST

पुणे -एका प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दौंड तालुक्यातील कुसेगाव हद्दीतील वनविभागाच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी व्यक्त केला.

माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक

हेही वाचा -गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यास बारामतीतील डॉक्टरांना आले यश

प्राथमिक माहितीनुसार, आज ९. ३० वाजण्याच्या सुमारास कुसेगावचे पोलीस पाटील गणेश रामचंद्र शितोळे आणि कुसेगावमधील काही ग्रामस्थांना माहिती मिळाली की, वनविभागाच्या जागेतून पुहीच्या घाटात दंडवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला एक मुलगा आणि एक मुलगी कोणतेतरी विषारी औषध पिऊन पडले आहेत. यावेळी कुसेगावचे पोलीस पाटील यांनी पाटस पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे आणि हवालदार घनशाम चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घटनास्थळी एक मुलगा आणि मुलगी तोंडातून फेस येत असलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच, त्यांच्या शेजारी हमला नावाचे कीटकनाशक आढळून आले. त्यांनी तातडीने १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. मुलाचे अंदाजे वय २४ वर्ष असावे आणि मुलीचे वय १६ ते १७ वर्ष असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघेही दौंड तालुक्यातील आहेत. मुलगी पाटस येथील आहे, तर मुलगा नानविज येथील आहे. डॉक्टरांनी दोघांनाही तपासले आणि उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -पुणे : कर्जावरील व्याजाची रक्कम न दिल्याने तरुणाचे अपहरण

ABOUT THE AUTHOR

...view details