पुणे -माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडीची मतदान प्रक्रिया काल (दि.२३) पार पडली. तर, आज बारामती येथील जयश्री गार्डन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील संचालक मडंळाच्या २१ जागांसाठी निलकंठेश्वर पॅनलकडून २१, सहकार बचाव पॅनलकडून २१ व इतर १४ असे एकूण ५६ उमेदवारांचे भवितव्य आज कळणार आहे. कारखान्याच्या या निवडणुकींकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल २ महिने जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत पवारांना पराभव पत्कारावा लागला होता. कारखाना ताब्यातून गेल्याची सल पवारांना होती. त्यामुळेच या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.