पुणे जिल्ह्यात 649 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात - Counting of votes in Pune
पुण्यातील 13 तालुक्यांमध्ये 649 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणीचे निकाल चार टप्प्यात दिले जाणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 649 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणीचे निकाल चार टप्प्यात दिले जाणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणूक व निकाला दरम्यान पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये कलम 144 चे निर्देश दिले आहे. निकालानंतर गुलाल उधळणे, मिरवणूक काढणे, डीजे लावणे व अन्य ठिकाणी गर्दी करणे यावर निर्बंध लावण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.