महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता बारामतीतही करता येणार कोरोनाची चाचणी...

बारामती व परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाची कोरोना चाचणी (कोविड १९) करण्यात येणार असून तो पॉझिटिव्ह सापडल्यास पुढील उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिली आहे. बारामतीसह राज्यातील कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड, आंबेजोगाई या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ही परवानगी देण्यात आली आहे.

baramati
baramati

By

Published : Apr 18, 2020, 10:40 AM IST

बारामती (पुणे) -कोरोना विषाणू (कोविड १९) तपासणी व निदान करण्यासाठी बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नुकतीच शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने मान्यता दिली आहे. देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह पुण्यात रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. पुण्याप्रमाणेच बारामतीत कोरोना चाचणी व निदान होणार असल्याने त्याचा बारामतीसह परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे.

बारामती व परिसरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाची कोरोना चाचणी (कोविड १९) करण्यात येणार असून तो पॉझिटिव्ह सापडल्यास पुढील उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिली आहे. बारामतीसह राज्यातील कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड, आंबेजोगाई या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ही परवानगी देण्यात आली आहे.

बारामतीत ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने परिसरातील रुग्णांवर जलदगतीने विषाणू संशोधन व निदान शक्य होणार आहे. बारामतीत एखादा कोरोना बाधित रुग्ण सापडल्यास व त्यांच्या संपर्कातील लोकांना पुण्यात जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे पुण्याच्या नायडू रुग्णालयावर येणारा ताण ही कमी होणार आहे.

उपलब्ध कर्मचारी वर्गामध्ये ही विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळा होणार आहे. बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीकडून आवश्यक त्या यंत्र व साधनसामग्रीची खरेदी जिल्हा अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत प्रत्येक्षात कामकामाजाला सुरुवात होईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details