महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 - पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 9

डॉ. नायडू रुग्णालयामध्ये प्रथमच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात 150 रुग्ण असून नायडू हॉस्पिटलमध्ये रुग्णांची क्षमता संपली आहे. त्यामुळे महापालिकरच्या बोपोडी येथील रुग्णालयात रुग्ण हलविले जात आहेत.

corona virus in pune
corona virus in pune

By

Published : Apr 8, 2020, 10:05 AM IST

पुणे - कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून या रोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांची पुण्यातील संख्या आता 9 झाली आहे. 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्याला रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये प्रथमच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात 150 रुग्ण असून नायडू हॉस्पिटलमध्ये रुग्णांची क्षमता संपली आहे. त्यामुळे महापालिकरच्या बोपोडी येथील रुग्णालयात रुग्ण हलविले जात आहेत.

दरम्यान, मागील 24 तासांत देशभरात 508 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 789 झाली आहे. यातील 4 हजार 312 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 353 जण बरे झाले आहेत. देशभरात 124 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details