महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटस येथे विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी; ५० पैकी ६ जण कोरोना पॉझिटीव्ह - covid center

पाटस या गावात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची थेट कोरोना तपासणी करण्यात आली. यवत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसून आले. विनाकारण फिरणाऱ्या ५० नागरिकांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये ५० मधील ६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली.

रॅपिट अँटीजेन टेस्ट
रॅपिट अँटीजेन टेस्ट

By

Published : May 6, 2021, 4:10 PM IST

पुणे - दौंड तालुक्यातील पाटस येथे मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी ५० जणांच्या कोरोना तपासणीमध्ये ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या सहा जणांना पाटस येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसली आहे.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना बधितांची संख्या वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. गावातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. परंतु अनेकजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण बाहेर फिरणारे असे लोक सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असते. पाटस या गावात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या
नागरिकांची थेट कोरोना तपासणी करण्यात आली. यवत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसून आले. विनाकारण फिरणाऱ्या ५० नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट किट द्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये ५० मधील ६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. या सहा जणांना उपचारासाठी लगेच पाटस येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तसेच बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर सापडत असल्याने कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार असल्याचे मत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. कारवाई दरम्यान पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, घनश्याम चव्हाण, सुजित जगताप उपस्थित होते. तर आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक भीमराव बडे आणि आरोग्य सेविका रॅपिड टेस्ट करण्यासाठी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details