महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाकडून पुणे जिल्ह्याचा आढावा, ग्रामीण भागातील उपाययोजनांबाबत समाधान - pune corona update

बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. पुणे शहर व जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय पथक पुणे जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे.

पुणे जिल्हयाचा आढावा
पुणे जिल्हयाचा आढावा

By

Published : Apr 29, 2020, 4:13 PM IST

पुणे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, तातडीने सर्व्हेक्षण, वैद्यकीय तपासणी, संस्थात्मक क्वारंटाईन तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या आहेत.

बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. पुणे शहर व जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय पथक पुणे जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भेट देवून पाहणी केली, तसेच आज पुणे जिल्हयातील कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 च्या रुग्णांची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details