पुणे:पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भवानी पेठेतील रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहराच्या हद्दी बाहेरील व्यक्तींचा आकडा ५ वर पोहचला आहे. तर शहरात आत्तापर्यंत ४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आज शहराबाहेरील दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू - पिंपरी-चिंचवड कोरोना मृ्त्यू
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळला नाही. मात्र, पुणे शहराच्या भवानी पेठेतील एका व्यक्तीचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दोघे पुण्यातील नाना पेठ आणि कसबा पेठ येथील रहिवासी आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह
माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळला नाही. मात्र, पुण्यातील भवानी पेठेतील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दोघे पुण्यातील नाना पेठ आणि कसबा पेठ येथील रहिवासी आहेत. मोशी, इंदिरानगर येथील रहिवासी असलेले दोघे कोरोनामुक्त झाले असून एकूण १०९ जणांना आत्तापर्यंत घरी सोडण्यात आले आहे.