कोरोनाबाधिताचा 'नायडू'तून पळण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांकडे पीपीई किट नसल्याने उडाला गोंधळ - mask
हा रुग्ण प्रवेशव्दारातून जेव्हा बाहेर जाण्यास निघाला तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने लांब बांबूच्या सहाय्याने त्याला ढकलत खाली पाडले. त्यानंतर काही वेळाने पीपीई किट घालून आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याला हाताला धरून वॉर्डमध्ये नेले आणि इतरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
![कोरोनाबाधिताचा 'नायडू'तून पळण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांकडे पीपीई किट नसल्याने उडाला गोंधळ कोरोनाबाधिताचा 'नायडू'तून पळण्याचा प्रयत्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7207745-613-7207745-1589533966808.jpg)
कोरोनाबाधिताचा 'नायडू'तून पळण्याचा प्रयत्न
पुणे -येथील नायडू रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांचे केंद्रबिंदू आहे. आज घडीला या रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, याच रुग्णालयातील एका वृद्ध कोरोनाबाधित रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेला. परंतु, सुरक्षा रक्षकांजवळ पीपीई किट नसल्यामुळे त्याला थांबवण्यास कुणीही पुढे येईना. यामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
कोरोनाबाधिताचा 'नायडू'तून पळण्याचा प्रयत्न