महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 919 कोरोना बाधितांची नोंद; 16 जणांचा मृत्यू - pune corona news

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील 919 जण कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर एकूण बाधितांची संख्या 20 हजार 317 वर पोहचली आहे. यापैकी, 12 हजार 445 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे कोरोना अपडेट
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील 919 जण कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

By

Published : Jul 31, 2020, 10:41 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील 919 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी पवन साळवी यांनी दिली आहे. मात्र, दररोज एक हजारांच्यावर असणारी आकडेवारी काहीशी खाली आल्याचे निरीक्षणही त्यांनी अधोरेखित केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे. येथील एकूण बाधितांची संख्या 20 हजार 317 वर पोहचली आहे. यापैकी, 12 हजार 445 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी 167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या मनपाच्या रुग्णालयांत 3 हजार 303 सक्रिय रुग्ण आहेत.

गुरुवारी झालेल्या मृतांमध्ये पिंपरी (स्त्री ५५ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ७५ वर्षे), चिखली (पुरुष ४२ वर्षे, पुरुष ५१ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), मोरवाडी (पुरुष ५७ वर्षे), काळेवाडी (पुरुष ६५ वर्षे, पुरुष ६२ वर्षे),), थेरगाव (पुरुष ३६ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ७४ वर्षे), मोशी (पुरुष ७० वर्षे), रुपीनगर (पुरुष ४१ वर्षे), चिंचवड गाव (स्त्री ७५ वर्षे), नेहरुनगर(पुरुष ७५ वर्षे), विद्यानगर चिंचवड(पुरुष ५५ वर्षे), निगडी (स्त्री ४१ वर्षे) यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details