महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कोविड रुग्णांची संख्या 6879 वर, 3661 जण बरे होऊन घरी - विभागीय आयुक्त म्हैसेकर

27 मे रोजीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधित रुग्णांच्या संख्येत एकूण 399 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 275, सातारा जिल्हयात 28, सोलापूर जिल्ह्यात 42, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

By

Published : May 29, 2020, 7:34 AM IST

पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6879 झाली असली तरी 3661 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2912 असून पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 180 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8521 झाली आहे. विभागातील 4179 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 3949 आहे. विभागात एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

27 मे रोजीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज (गुरुवारी)पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येत एकूण 399 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 275, सातारा जिल्ह्यात 28, सोलापूर जिल्ह्यात 42, सांगली जिल्हयात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 80303 नमुने तपासणीसाठी पाठविण्याात आले होते. त्यापैकी 74562 चा अहवाल प्राप्त आहे. 5741 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 65925 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8521 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details