पुणे - शहरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना सर्दी, खोकला यासारखे आजार आहेत. त्यांनी आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच तपासणीनंतर जर आवश्यकता वाटल्यास कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रभाव; पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली - पुणे करोना लेटेस्ट बातमी
प्रशासनाने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना सर्दी, खोकला यासारखे आजार आहेत. त्यांनी आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे आहे.
naidu hospital pune
दरम्यान, रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते आहे. विशेषतः परदेशात जाऊन आलेले नागरिक यांची तपासणी रुग्णालयात होत असल्याने, असे नागरिक देखील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.
हेही वाचा -COVID-19 : काळजी नको, दक्षता घ्या..! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन