पुणे - मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा व पैलवाणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मुळशी तालुक्यातील सुस गावामध्ये बाळासाहेब चांदरे व अग्निजा चांदरे यांनी हे कोविड सेंटर सुरु केले आहे. या कोविड सेंटरमध्ये एक बाप-लेक कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि त्यांची मुलगी डॉ. अग्निजा हे दोघेही आज कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.
बाप-मुलीकडून कोरोना रुग्णांची सेवा, गावात उभारले कोविड सेंटर कोविड रुग्णालयात बाप-लेक देत आहे रुग्णांना सेवा
बाळासाहेब चांदेरे यांनी मागच्या कोरोना लाटेत संपूर्ण मुळशी तालुका आणि त्यांचे गाव असलेल्या सुस आणि परिसरात गोरगरीब लोकांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते. यावेळी तालुक्यात कोविड सेंटर सुरु करून ते स्वतः लक्ष देत आहेत. तसेच, रुग्णांची सेवा करत आहेत. तर, त्यांची मुलगी शासकीय कोरोना रुग्णलयात सेवा देत आहे. निलेश लंके यांच्या कोविड सेंटरपासून प्रेरित होऊन त्यांनी हे कोविड सेंटर सुरु केले आहे. दरम्यान, या कोविड सेंटरमध्ये रोज सकळी संध्याकाळी सांप्रदाय़ीक कार्यक्रमही होतात. येथे रोज गावची भजनी मंडळी भजनाचा कार्यक्रम घेतात.
रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध
बाळासाहेब ठाकरे स्मुर्ती कोविड सेंटरमध्ये एकूण 81 बेड्स उपलब्ध आहेत. 50 बेड्स आणि 31 ऑक्सिजन बेड्स अशा 81 बेड्सचे कोविड सेंटर सुरु आहे. एकूण सातपेक्षा अधिक डॉक्टर इथं रुग्णांची सेवा करत आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोविड सेंटर सुरु असणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेसाठीही विशेष तयारी या कोविड सेंटरमध्ये सुरु असल्याचेही बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.