महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक...! पिंपरी चिंचवडमध्ये 12 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 79 वर - लॉकडाऊन

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत, अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

corona patient raised in pcmc by twelve
चिंताजनक...! पिंपरी चिंचवडमध्ये 12 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 79 वर

By

Published : Apr 24, 2020, 1:23 PM IST

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून हा आकडा ७९ वर पोहोचला आहे. तर २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनामुळे ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ कोरोनाबाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत एकूण २१ जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान, १२ जणांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे रात्री उशिरा अहवाल आले आहेत. नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details