महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Update: पुणेकरांची चिंता वाढली; पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, शहरात 460 रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,आज देशात कोरोनाच्या 1700 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Corona outbreak
कोरोनाचा प्रादुर्भाव

By

Published : Mar 25, 2023, 12:18 PM IST

पुणे : राज्यात मागील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दर एकाच्या आत होता तो आता तीन टक्क्यावर आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सर्व राज्याने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. सध्या एक्सबीबी १.१६ हा ओमीक्रॉनचा प्रकार कोरोनाच्या वाढत्या भीतीस कारणीभूत ठरत आहे. पुणे जिल्ह्यात, पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण मिळून सध्या 460 रुग्ण ॲक्क्टिव्ह आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत ४०३ रुग्ण आहेत. तसेच ठाणे तिसऱ्या क्रमांकावर असून 311 रुग्ण आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या शून्य आहे.

सर्वाधिक रुग्ण पुण्यात:लॉकडाऊन मध्ये पुणे शहर हे दोन वर्षात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत सर्वात टॉपला होते. आताही सध्या ती स्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी असले तरी, आताही इतर जिल्ह्याच्या तुलनात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.



कोरोनासाठीपोषक वातावरण:स्वाइन फ्लू असो किंवा कोरोना, या साथीच्या आजारासाठी नेहमीच हॉटस्पॉट ठरलेले शहर पुणे हे आहे. रुग्णांची वाढती संख्या त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या तुलनेत होणारे निदान, प्रयोगशाळेची वाढलेली संख्या, एनआयव्ही यामुळे ही संख्या वाढलेली दिसून येते. कोरोना काळात याचा पुणेकरांना चांगला अनुभव आला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही देशातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नोंदवली गेली. या साथीच्या आजारासाठी येथील वातावरण पोषक असल्याने ही संख्या दिसून येते.



H3N2 च्या रुग्णसंख्येवर लक्ष : सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे चारशे साठ रुग्ण आहेत. तसेच 9 मार्च 2020 पासून आत्तापर्यंत पंधरा लाख सहा हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर वीस हजार सहाशे आठ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई, ठाणे या जिल्ह्याचा नंबर लागतो. महापालिकेकडून मात्र पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आहे. महापालिकडून योग्य ते उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्य बरोबरच H3N2 च्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर शहरातली रुग्णसंख्या नियंत्रित असल्याची माहिती डॉक्टर सूर्यकांत देवकर साथ रोग अधिकारी पुणे मनपा यांनी दिली आहे.

हेही वाचा: Corona Patient मास्क वापरा राज्यात कोरोनाचे 343 रुग्ण तर 3 मृत्यूंची नोंद मुंबईत 20 रुग्ण ऑक्सिजनवर

ABOUT THE AUTHOR

...view details