महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar on Pune Corona Rules : पुणे जिल्ह्यात अजूनही आहे तेच निर्बंध; पुढच्या आठवड्यात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ - उपमुख्यमंत्री अजित पवार - अजित पवार कोरोना नियमावली निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्याबाबतीत जे काही नियमावली लागू केली आहे तीच नियमावली पुणे जिल्ह्यातही लागू असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar in Corona Review Meeting Pune ) यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.

ajit pawar
अजित पवार

By

Published : Jan 15, 2022, 8:32 PM IST

पुणे - राज्यासह शहरात देखील दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ( Corona Patients Increasing In Maharashtra ) अशातच शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता नवीन नियमावली लागेल की काय अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात पुढील आठवड्यापर्यंत आहे तेच निर्बंध ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्याबाबतीत जे काही नियमावली लागू केली आहे तीच नियमावली लागू असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar in Corona Review Meeting Pune ) यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन विधानभवन येथे करण्यात आले होते. यावेळी या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे आणि पिंपरी शहरात शाळेत जाऊन मुलांना देण्यात येणार लसीकरण -

केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या लहान मुलांचे 43 टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात महाविद्यालय, शाळेत जाऊन 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. तसेच लसीकरण हे पुणे आणि पिंपरी शहरात देखील करण्यात येणार आहे, असेदेखील यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -Sushilkumar Shinde Criticized Bjp : भाजपाच्या हुकूमशाहीला लोक कंटाळलेत - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

जिल्ह्यातील जम्बो रुग्णालय सुरू होणार -

जिल्ह्यात वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील जम्बो रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे आणि तशी तयारीदेखील करण्यात आली आहे. आज जे रुग्ण वाढत आहे त्यातील बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहे. मात्र, रविवारी जर रुग्णवाढ अशीच राहिली तर त्यासाठी तयारी म्हणून जिल्ह्यातील जम्बो रुग्णालयांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

जिल्ह्यात 42 लाख 45 हजार अधिक वसूल करण्यात आले दंड -

पुणे जिल्ह्यात वाढता रुग्णसंख्या पाहता मागील आठवड्यात अजित पवार यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विना मास्क आणि विनामस्क थुंकल्यावर कारवाई करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात 9,270 नागरिकांवर विना मास्कची कारवाई करण्यात आली आहे. तर 42 लाख 45 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. हे दुर्दैवी आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं.

विमानतळ पुण्यातच होईल -

पुणे जिल्ह्यातीळ पुरंदर येथे विमानतळाबाबत जी काही चर्चा सुरू आहे त्यावर अजित पवार म्हणाले की, विमानतळ हे पुण्यातच होणार आहे. ते कुठं होईल याबाबत सांगू शकत नाही. विमानतळ हे पुण्यातच होईल, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details