पुणे- शहरातील वाहतूक आज दुपारी 3 नंतर पोलिसांनी बंद केली आहे. शहरात जमावबंदी असतानादेखील सोमवारी सकाळपासून नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारपासून रस्त्यावर वाहन बंदी केली आहे.
पुणे पोलिसांनी शहरातील वाहतूक दुपारी 3 नंतर केली बंद
शहरातील वाहतूक आज दुपारी 3 नंतर पोलिसांनी बंद केली आहे. शहरात जमावबंदी असतानादेखील सोमवारी सकाळपासून नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारपासून रस्त्यावर वाहन बंदी केली आहे.
पुणे पोलिसांनी शहरातील वाहतूक दुपारी 3 नंतर केली बंद
रविवारी जनता कर्फ्यूनंतर पुणे शहरात रात्री 9 ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून पुन्हा रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढायला लागली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्यावर वाहन बंदी केली असून दुपारी शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून तशी घोषणा करण्यात येत होती.
Last Updated : Mar 23, 2020, 5:05 PM IST