पुणे - देहूमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी बुधवारी लाखो भाविक दाखल झाले होते. विठू नामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे दरवर्षीपेक्षा यंदा कमी गर्दी होती. तरिही एक ते दीड लाखांचा जमाव पाहता कोरोनाची पाहिजे तेवढी जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देहू नगरीत घुमला 'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष; कोरोनामुळे वारकऱ्यांच्या संख्येवर परिणाम - corona dehu
तुकाराम बीज कार्यक्रमानिमित्त देहूमध्ये एक ते दीड लाखांचा जमाव पाहता कोरोनाची पाहिजे तेवढी जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले की काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
![देहू नगरीत घुमला 'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष; कोरोनामुळे वारकऱ्यांच्या संख्येवर परिणाम tukaram bij](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6374523-thumbnail-3x2-bij.jpg)
हेही वाचा -'औरंगाबादचे नामांतर अशक्य.., प्रयत्न केल्यास ठरेल सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'
राज्याच्या काना कोपऱ्यातून भाविकांनी आज दुपारी बारा वाजता अभिवादन केले. बाराचा ठोका पडला आणि देहूनगरीमध्ये एकच आवाज घुमू लागला. 'ग्यानबा तुकाराम' 'ग्यानबा तुकाराम'. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला. या बिजेत सहभागी होण्यासाठी काही दिवस आगोदरच येऊन दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ व वीणा-टाळ, मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तनचा कार्यक्रम पार पडला.