पुणे -कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजनअभावी राज्यासह देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील जुन्नर येथे कोरोनाबाधित मृताच्या नातेवाईकांनी एक वेगळा उपक्रम राबविला आहे.
जुन्नरमधील संतोष शिंगोटे (वय 38) यांना एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांना अधिक काही त्रास जाणवत नव्हता म्हणून त्यांच्या खामुंडी गावातीलच एका डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांनी त्यांची तब्येत खालावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना श्वास घ्यायलाही जाणवू लागला. म्हणून त्यांना ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर त्यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरुच होता. अशातच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला. तरी त्यांच्यावर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयात काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा शिल्लक होता. पण तो संतोष यांना पुरेसा नव्हता. यानंतर ऑक्सिजनअभावी शिंगोटे यांचा मृत्यू झाला.