महाराष्ट्र

maharashtra

नियमांचे पालन केले तरच कोरोनाची साखळी तुटेल - अजित पवार

By

Published : Jun 20, 2020, 9:32 PM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली.

Ajit Pawar
अजित पवार

पुणे(बारामती) - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावी लागणार. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नियम पाळले गेले पाहिजेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालनकरून सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार केला

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीचे सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे. तसेच गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, हे काटेकोरपणे तपासले पाहिजे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत रुग्णांचा शोध घेणे, कोविड आणि नॉन-कोविड रूग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तपासणी प्रक्रिया व्यापक करावी, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन अजित पवार त्यांनी केले.

बारामती तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रूग्ण, उपचार सुरू असलेले रूग्ण तसेच क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांसंदर्भात त्यांनी माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details