महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये साडेआठ लाख नागरिकांना कोरोना होऊन गेला! - antigen test on pune

पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांचा डॉ. डी.वाय पाटील अँड रिसर्च आणि महानगर पालिकेच्या विद्यमाने सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात शहरातील विविध भागातून दोनशे ठिकाणाहून रक्ताचे पाच हजार नमुने घेण्यात आले होते. त्यानुसार 33.9 टक्के नागरिकांमध्ये अँटी बॉडीज आढळल्या आहेत.

pune corona news
पिंपरी-चिंचवडमध्ये साडेआठ लाख नागरिकांना कोरोना होऊन गेला!

By

Published : Nov 2, 2020, 10:48 PM IST

पुणे - पिंपरी चिंचवड शहरातील साडे आठ लाख नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणात हजार नागरिकांचे अँटी बॉडीज सॅम्पल घेण्यात आले होते. शहरातील दोनशे भागांची निवड यासाठी करण्यात आली. झोपडपट्टी, बैठी घरं आणि सोसायटी अशी विभागवारी करण्यात आली होती. त्यानुसार 33.9 टक्के नागरिकांमध्ये अँटी बॉडीज आढळल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये साडेआठ लाख नागरिकांना कोरोना होऊन गेला!
पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांचा डॉ. डी.वाय पाटील अँड रिसर्च आणि महानगर पालिकेच्या विद्यमाने सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात शहरातील विविध भागातून दोनशे ठिकाणाहून रक्ताचे पाच हजार नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर हा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. शहरातील एकूण लोकसंख्या ही 24 लाख असून या साडे आठ लाख नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने डॉ. डी. वाय पाटील या खासगी संस्थेला या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. तसेच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अँटीबॉडीज जास्त प्रमाणात आढळल्याचे समोर आले आहे. अँटी बॉडीजची टक्केवारीझोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८%, झोपडपट्टी सदृश भागातील नागरिकांमध्ये ३८.३%, गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७%, पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज, महिलांमध्ये दर ३३.८% पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज पुरुषांमध्ये दर २८.९% महिलामधील पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज चा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. वयोगटानुसार अँटी बॉडीजवयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले असून त्याचा दर ३५.५% इतका आहे. किशोरवयीन १२ ते १८ वर्षाच्या मुला-मुलीमध्ये २४.९% इतका आहे. ११ ते ३० वयोगटामध्ये २९.७%, ३१ ते ५० पयोगटामध्ये ३१.२% व ६६ वयोगटावरील नागरिकांमध्ये २८.२% इतका आहे. कोविड-१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यूदर ०.१८% आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details