महाराष्ट्र

maharashtra

मंचर ग्रामपंचायतमध्ये कोरोना अँटीजेन चाचणीचा महामेळावा

मंचर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेनुसार गावातील सहा वार्ड मध्ये कोरोना तपासणीची तात्पुरती सहा केंद्रे उभारण्यात आली. या सहाही ठिकाणी गावातील नागरिकांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना तपासणीच्या या महा मेळाव्याला मंचर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

By

Published : Apr 21, 2021, 7:24 PM IST

Published : Apr 21, 2021, 7:24 PM IST

मंचर ग्रामपंचायत
मंचर ग्रामपंचायत

पुणे - कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील सर्व नागरिकांच्या कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. मंचर शहरातील कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ व ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज (बुधवारी) मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला.

मंचर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेनुसार गावातील सहा वार्ड मध्ये कोरोना तपासणीची तात्पुरती सहा केंद्रे उभारण्यात आली. या सहाही ठिकाणी गावातील नागरिकांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना तपासणीच्या या महा मेळाव्याला मंचर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या केंद्रांवर कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यासाठी सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. शहरातील नागरिकांनी चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details