पुणे- महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन केले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कंपनी व्यवस्थापना बरोबर चर्चा निष्फळ झाल्याने वीज कामगार संघाच्या कंत्राटी कामगारांनी हे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या बंदमध्ये राज्यातील सुमारे 22 हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत .
कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या रोजगार आणि अन्य विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने कंपनीने व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. मात्र, त्यातून कोणताच मार्ग निघाला नाही. त्यानंतर पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी सरकार विरोधात घोषणा देऊन बंद आंदोलन सुरू केले.