पुणे: फसवणुक प्रकरणी कोंढवा पोलीसांनी (Kondhwa Police Thane) अनुज उमेश गोयल आणि अंकित उमेश गोयल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. स्वाती तानाजी पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. २०१८ मध्ये गोयल यांच्या मालकीच्या मिनामानी गंगा बिल्डर (Minamani Ganga Builder) या कंपनी सोबत श्री कन्ट्रक्शनच्या (Shree Construction) स्वाती पाटील यांना दोन बिल्डींगचे काम देण्यात आले. या करारानुसार बिल्डर ६० टक्के रक्कम ही चेक स्वरुपात देईल तर उर्वरीत रकमेचे ३ हजार स्वेअर फुटचे फ्लॅट देईल असे ठरले होते.
स्वाती पटील यांनी झालेल्या कामाचे १५ कोटी ५५ लाखांचे बील मिनामानी गंगा बिल्डरला पाठवले. त्यापैकी ६ कोटी ३३ लाख ३७ हजार १६३ रुपयांच्या बिलाची रक्कम मिनामानी गंगा बिल्डरने पाटील यांना दिली. मात्र उरलेल्या रकमेबाबत चेक देण्यात आला ज्यात १ कोटी ८८ लाख २२ हजार ६२३ रुपये चेकद्वारे दिले जाणार होते. वरील रकमेचे चेक पाटील यांना दिले परंतु बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक परत आले.