पुणे - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यातील संभाजी उद्यानात किल्ले बनवा स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीसहून अधिक तरुणांच्या संघांनी सहभाग घेतला असून यात २० हून अधिक किल्ले तयार केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास आणि त्याची माहिती नागरिकांना एकाच जागी मिळणार आहे.
पुण्यातील संभाजी उद्यानात किल्ला बनविण्याची स्पर्धा आणि प्रदर्शन - Sambhaji Park in Pune
पुणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीसहून अधिक तरुणांच्या संघांनी सहभाग घेतला असून यात २० हून अधिक किल्ले तयार केले आहेत.
हेही वाचा -'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट
यंदा या स्पर्धेचे हे २७ वे वर्ष आहे. संभाजी उद्यानात पार पडलेल्या स्पर्धेत तरुणांनी किल्ले तयार केले आहेत. या प्रदर्शनात राजगड, रायगड, सिंहगड, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, तिकोना यासारख्या अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची माहिती सांगणारे फलकही लावण्यात आले आहेत. जेणेकरून हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास समजेल. ३ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.