पुणे- आषाढी एकादशीची वारी तोंडावर आली आहे. मात्र, आळंदी नगरपरिषदेकडून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देवाच्या आळंदीत दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - आषाढी एकादशी
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदी शहर व परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक स्वच्छ पाण्याची मागणी करीत असतात. मात्र, याकडे आळंदी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदी शहर व परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक स्वच्छ पाण्याची मागणी करीत असतात. मात्र, याकडे आळंदी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. संपूर्ण शहरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आळंदीतील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
अनेक वारकरी देवाच्या आळंदीमध्ये वारकीर पंथांच्या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. आपली संस्कृती, वारकऱ्यांचा वारसा जपण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून किर्तनकार प्रबोधन करतात. मात्र, याच वारकऱ्यांचा विसर आळंदी नगरपरिषदेला पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.