महाराष्ट्र

maharashtra

Pune Crime : गुंड आप्पा लोंढे, वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट उधळला

By

Published : Feb 3, 2023, 7:28 PM IST

पुण्यातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे, वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला आहे. या खून खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी उरळी कांचन परिसरातून पिस्तूल आणि घातक हत्यारासह ताब्यात घेऊन अटक केली.

Pune Crime
हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट उधळला

पुणे :उरुळी कांचन परिसरातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे आणि वाळूमाफिया संतोष जगताप यांचा खून प्रकरणात आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ हासुद्धा येरवडा कारागृहात आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये साक्षीदार असलेल्या इसमाचा खून करण्याच्या हेतूने मिसाळ याने चारही आरोपींना लाखोंची सुपारी दिली होती. हे चारही आरोपी पिस्तूल आणि घातक शस्त्र घेवून फिर्यादीला गोळ्या घालवण्यासाठी जात असताना, पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्या पथकाने उरळीकांचन परिसरात दत्तवाडी रोडवरून झडप टाकून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पूर्ववैमनस्यातून आप्पाच्या हत्येचा कट: आप्पा लोंढे याचे पुण्यातील अनेक जणांशी वैर होते. वाळूमाफिया विरुद्ध राजकीय वाद असल्याने अनेकांंशी त्यांचे वाद व्हायचे. तो राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत होता. अनेकांच्या हत्या प्रकरणात तो आरोपी होता. त्यासोबतच त्याची पुणे आणि जवळच्या इतर परिसरात मोठी दहशत होती. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून आप्पाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार 28 मे 2015 मध्ये आप्पा लोंढे याला उरुळीकांचन जवळील शिंदवणे रस्त्यावर थांबवून गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली होती.

आरोपींनी ठोकल्या बेड्या :आशिष अनिल वरघडे, उद्धव राजाराम मिसाळ, सुरज सतीश जगताप आणि किशोर उर्फ शिवा छबु साळुंखे या कुख्यात गुंडांना लोणी काळभोर पोलिसांनी उरळी कांचन परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हेगारी दत्तक योजना : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे वाढते स्वरूप पाहता पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरांमध्ये गुन्हेगार दत्तक योजना राबवली जात आहे. जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराने कुठलेही सक्रिय गुन्हेगारी करू नये, त्याच्यावर लक्ष ठेवता यावे यासाठी पुण्यामध्ये ठाणे अंमलदार आहेत त्यांना आता ह्या गुन्हेगारांना दत्त घ्यायचे आहे.

योजना राबविण्याचे कारण : एका अंमलदाराकडे साधारणपणे दोन ते तीन जर गुन्हेगार दत्तक असले तर त्यांचे कामही प्रभावीपणे होईल आणि गुन्हेगारांवरसुद्धा वचक पडेल यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुन्हेगार दत्तक योजनेमुळे पोलिसांचे कारवाईचे प्रमाण वाढणार असल्यामुळे ही योजना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात राबविण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली. एका पोलिसाकडे जर दोन-तीन गुन्ह्यांचा तपास असेल तर त्याची कार्यशक्तीसुद्धा वाढते आणि त्यातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, असा हा उपक्रम असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तातील परिमंडळ क्रमांक तीन मधल्या गुन्हेगारांचे आदान प्रदान करण्यात आले आहे. परिमंडळ ३ मध्ये कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रोड, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश असून यामधील गुन्हेगारांची ओळख पटवून आदान-प्रदान करण्यात आले आहे.

हेही वाचा :Mumbai Crime : धार्मिक स्थळांवर खोट्या नाण्यांच्या बदल्यात खऱ्या पैशांचा खेळ; आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details