पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत शहर काँग्रेसने गुरुवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरले.
महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसचा पालिकेवर धडक मोर्चा - pimpri chinchwad news
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मनमानी कामकाजावर आक्षेप घेत शहर काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मनमानी कामकाजावर आक्षेप घेत शहर काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाला मोरवाडीतून सुरुवात झाली.
यावेळी महापालिका हद्दीतील प्रत्येक झोपडपट्टीला फोटोपास देण्यात यावा. २००२ नंतरच्या प्रत्येक झोपडीचा पुन्हा सर्व्हे झालाच पाहिजे. प्रत्येक झोपडीला टॅक्स पावती मिळालीच पाहिजे. झोपडीची हस्तांतर फी रद्द करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, मोर्चेकरांनी यावेळी भाजप सरकारचा धिक्कार असो, महापौर, आयुक्तांचा धिक्कार’, झोपडपट्टी वासियांच्या समस्या मार्गी लावा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून सोडला.