पुणे :राज्यात जे ईडीचे सरकार आले आहे. ते भ्रष्ट आणि भीतीने आले आहे. महाराष्ट्राबाबत द्वेष काही मूठभर गुजरातच्या लोकांच्या मनात आहे. दिल्लीत जे बसले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा विचार केला आहे. कर्नाटकचे जे भाजप सरकार (Nana Patole criticized BJP On Boundriesm) आहे. त्यांना आत्ता राज्याचे तुकडे करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. राज्यातील जो सीमा वाद आहे. त्यापलीकडे येऊन सोलापूर सांगली येथील काही भाग कर्नाटकला जोडण्याचे कटकारस्थान भाजपच्या वतीने सुरू झालेले (Maharashtra Karnatak Boundriesm issue) आहे. राज्याचे तुकडे काँग्रेस कधीही होऊ देणार नाही. असे आक्रमक मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. 36व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत (Nana Patole criticized BJP) होते.
Nana Patole : दिल्लीतील भाजप नेत्यांनी कर्नाटकमधील भाजप सरकारला दिले राज्याचे तुकडे करण्याचे टार्गेट - नाना पटोले - Nana Patole criticized BJP On Boundriesm
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटील (Congress state president Nana Patole) यांच्या हस्ते 36व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस समारंभ होता. त्यावेळी माध्यमांशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnatak Boundriesm issue) बोलताना त्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांवर टीका केली. कर्नाटकमधील भाजप सरकारला राज्याचे तुकडे करण्याचं टार्गेट (Nana Patole criticized BJP) दिले, असे वक्तव्य करत त्यांनी समाचार घेतला.
पदाचा राजीनामा द्यावा :राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अवमान केला जात आहे. त्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर अग्रेसर आहे. सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीतील नेते असो की, राज्यातील नेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात आहे. देशभरात भारतीय जनता पक्षाला देशात पेशवाई आणायची आहे. ज्यांना शिवशाही पाहिजे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि ज्यांना देशात पेशवाई पाहिजे त्यांनी त्यांच्या सोबत राहावे. काँग्रेस पक्ष हा शिवशाही बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान म्हणजे राज्याचा अवमान आणि राज्यातील जनतेचा अवमान आहे. भाजप ज्या पद्धतीने अवमान करत आहे. त्या चुकीला माफी नाही. राज्यातील अभद्र आणि अवैचारिक सरकार जे आहे. त्या सरकारचा लोकशाही पद्धतीने कडेलोड करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे यावेळी नाना पटोले (Congress state president Nana Patole) म्हणाले.
शिवाजी महाराजांचा अवमान :छत्रपती उदयनराजे यांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की, छत्रपती हे सर्वांसाठी आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मानणारे आहे. आज सातत्याने देशभरात भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात आहे. फक्त निवडणुका आल्या की, शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत थोडा जरी स्वाभिमान असेल तर, आज मंत्री खासदार आणि आमदार झाले आहेत, ते खुर्ची सोडू शकता. पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करायचा असेल आणि खुर्ची सोडायची नसेल तर तुम्ही ते करा. आमचे काहीही म्हणणे नाही. असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.