महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari on Congress : देशात काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा - नितीन गडकरी - congress should be strong said nitin gadkari

देशात काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ( Congress Party Should be Strong ) ते पुण्यात बोलत होते. ( Nitin Gadkari on Congress in Pune ) देशामध्ये काँग्रेस कमी होत असल्याने प्रादेशिक पक्षांची ताकद वाढत आहे, ही बाब गंभीर असल्याचेही गडकरी म्हणाले.

minister nitin gadkari
नितीन गडकरी

By

Published : Mar 27, 2022, 12:15 PM IST

पुणे -देशात काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ( Congress Party Should be Strong ) ते पुण्यात बोलत होते. ( Nitin Gadkari on Congress in Pune ) देशामध्ये काँग्रेस कमी होत असल्याने प्रादेशिक पक्षांची ताकद वाढत आहे, ही बाब गंभीर असल्याचेही गडकरी म्हणाले.

विरोधी पक्ष लोकशाही मजबूत करतो -देशांमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक हे असणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष देशामध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, आम आदमी पार्टी तसेच प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसची जागा घेत असल्याचे नितीन गडकरी यांनी नाव न घेता प्रादेशिक पक्षांवर टीकादेखील केली आहे. एका खासगी वृत्तपत्राच्या पुरस्कार कार्यक्रमांच्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले.

हेही वाचा -Yogi Meeting With Chief Secretary : योगी अ‍ॅक्शन मोडमध्ये!सचिवांना कृती आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश

भाजप-शिवसेना युतीवर गडकरींच भाष्य -याच मुलाखतीत नितीन गडकरी यांना भजपा आणि शिवसेना यांच्यात जो दुरावा निर्माण झाला आहे आणि आता तुम्ही या दोन पक्षात पुल बांधणार का, असं प्रश्न विचारला असता नितीन गडकरी यांनी जे पुल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तेच पुल मी बांधतो. सध्या मी नॅशनल हायवे बांधत आहे, असं उत्तर देत आपलं सध्या राष्ट्रीय राजकारणाकडेच लक्ष असल्याचं वक्तव्य गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details