महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात, मात्र आघाडीकडून प्रचाराला सुरुवात

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी अखेर उमेदवाराविनाच निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.

काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात मात्र, आघाडीकडून प्रचाराला सुरुवात

By

Published : Mar 31, 2019, 7:45 PM IST

पुणे- काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदार संघासाठी अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी अखेर उमेदवाराविनाच निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात पुण्यापासून दिल्लीपर्यंत अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून अद्यापही पुण्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कार्यकर्त्यांकडून लवकरात लवकर नाव घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात मात्र, आघाडीकडून प्रचाराला सुरुवात

पुणे काँग्रेसच्यावतीने तीनही संभाव्य उमेदवारांना एकत्र करून रविवारी दुपारी कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाव्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या समर्थनार्थ घोषणा देऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

ABOUT THE AUTHOR

...view details