पुणे - राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २४० जागांवर एकमत झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच उर्वरित ४८ जागांसाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरु असल्याचेही पवार म्हणाले. अद्यापही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित आघाडीशी बोलणी झाली नसल्याचे पवार म्हणाले.
विधानसभेसाठी २४० जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत - शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेस
विधानसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २४० जागांवर एकमत झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच उर्वरित ४८ जागांसाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरु असल्याचेही पवार म्हणाले.
शरद पवार
पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सत्तेचा गैरवापर करुन आमदारांना फोडण्याचे काम सुरु असल्याचे पवार यावेळी म्हणाले. खासगी संस्था टिकवण्यासाठी अनेकजणांवर भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे सांगितले.