पुणे - काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. बुधवारी रात्री मुंबईहून-पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. तर कदम यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
बुधवारी रात्री मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांची गाडी झाडाला धडकली. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. विश्वजित कदम आणि ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहेत. कदम यांच्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. तर कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे त्यांनी मेसेजद्वारे सांगितले आहे.