कॉंग्रेस नेते ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना पुणे : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सामील होणार की नाही यावर चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत, असे विधान केले होते. त्यानंतर आता कॉंग्रेस नेत्यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आघाडीसाठी कॉंग्रेस सकारात्मक : माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, गेल्या सात वर्षापासून आम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबर चर्चा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी सामील झाले तर आघडीला मोठी ताकद निर्माण होणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्याबाबत काँग्रेसचा कोणताही विरोध नाही. कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास सकारात्मक असल्याचे यावेळी चव्हाण म्हणाले.
पुण्यात कॉंग्रेसचे निदर्शने : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी, अदानी समुहात LIC ने केलेली गुंतवणूक व सर्वसामान्य जनतेच्या पैशाचे झालेले नुकसान यासाठी आंदोलन करण्यात आले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख उपस्थितीत LIC बिल्डींग, अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीबाबत ईटीव्ही भारत सोबत संवाद साधला.
बिनविरोध निवडणूकीवर काय म्हणाले पटोले : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व राजकीय पक्षांना फोन करणार आहेत. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही देखील याआधी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. ज्या प्रथा परंपरेची गोष्ट ते करत आहे त्यात जर ते फोनवरच चर्चा करत असतील आणि सत्तेची गुर्मी दाखवत असतील तर ते चुकीचे आहे. आम्ही संस्कृतीचे पालन नेहमी करत आलेलो आहोत, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.
आम्ही सगळे एकत्रच : माजी मंत्री अशोक चव्हाण यांना बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल म्हणाले की, काँग्रेस पक्षात कुठेही अलबेल नाही. वावड्या उठवणाऱ्यांना उठवू द्या. आम्ही सगळे एकत्रच इथ आहोत. काँग्रेस कधीही असे काम करणार नाही. तसेच काँग्रेसमधील कोणीही असे काम करणार नाही. आमच्यात एकोपा आहे विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्ही विदर्भातील दोन जागा जिंकलेल्या आहेत. आम्हाला मिळालेले यश पाहून भाजप वावड्या उठवत आहे. पण त्याचा परिणाम होणार नाही, असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले. तसेच थोरात यांची नाराजी असेल तर ती त्यांनाच विचारावे असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. जे सध्या सुरू आहे त्याबाबत लवकरच सर्व काही सेट होईल.
हेही वाचा :Shinde Group Criticizes Jitendra Awhad: इतिहासात डॉक्टरेट, तरी ही मानसिकता; आव्हाडांनी आत्मचिंतन करावे- शिंदे गटाचा सल्ला