पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत भाषण दिले. पंतप्रधानांच्या भाषणावरून कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले सर्व प्रश्न मोदींनी फेटाळून लावले. तुम्ही पंतप्रधान मोदींचे भाषण पाहिले असेल तर ते पान टपरी उभे राहून बोलत असल्यासारखे होते, अशी खोटक टीका त्यांनी केली. तसेच तुम्ही अदानीचे चौकीदार आहात की 140 कोटी लोकांचे?, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
पटोलेंचे पंतप्रधानांवर टीकास्त्र : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदार राहुल गांधी तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी समूहाच्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण देत असताना पान टपरीवर असल्यासारखे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणाले होते की, मी चौकीदार आहे. यामुळे 140 करोड देशाचे चौकीदार आहेत की अदानींचे चौकीदार आहेत, याचे तुम्हाला देशाला उत्तर द्यावेच लागेल, असे पटोले म्हणाले आहेत.
भाजपकडून लोकशाहीची हत्या : पटोले पुढे म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी समूहाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले होते. ते प्रश्न रेकॉर्डवरून काढले गेले. लोकशाहीची हत्या करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायलायने देखील त्यांची भूमिका मांडली आहे की, सेबी व आरबीआय अदानी समूहाच्या प्रकरणात काय करत होती? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.