महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 26, 2019, 2:17 PM IST

Updated : Oct 26, 2019, 2:26 PM IST

ETV Bharat / state

गोविंदबागेत राजकीय खलबतं, बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बारामतीतील गोविंदबागेत भेट घेतली. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला

पुणे -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बारामतीतील गोविंदबागेत भेट घेतली. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरु असताना इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे. एकट्या राष्ट्रवादीने ५४ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला ४४ जागा, शिवसेनेला ५६ जागा, तर भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही हालचाली सुरु केल्या आहेत.

बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला

भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे युतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याआधीच शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील असा गौप्यस्फोट केला होता. मात्र, दुसरीकडे शरद पवारांनी सत्तेत सहभागी न होता सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडू असे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात गोविंदबाग मध्यवर्ती केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत. या बैठकीमध्ये कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत.

Last Updated : Oct 26, 2019, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details