खेड/पुणे - राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी अभेद्य असून ती कायम राहणार आहे. मात्र, काँग्रेस स्वतंत्र लढण्याची भाषा करत तर ते योग्य नाही. कारण काँग्रेसला पुढील काळात "आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे" स्पष्ट मत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला शिवाजी आढळराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेसला पुढील काळात आघाडीशिवाय पर्याय नाही - शिवाजी आढळराव पाटील
राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी अभेद्य असून ती कायम राहणार आहे. मात्र, काँग्रेस स्वतंत्र लढण्याची भाषा करत तर ते योग्य नाही. कारण काँग्रेसला पुढील काळात "आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे" स्पष्ट मत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केले आहे.
शिवाजी आढळराव पाटील
पाटलांनी पुणे-नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि जुन्नर तलुक्यातील नारायणगाव या दोन्ही शहरांच्या बायपास व पुलाच्या कामांची पाहणी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण, अशोक खांडेभराड, ज्योती अरगडे हे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.